थेरगावमधील बिअर शॉपीच्या मालकाला जीवेमारण्याची धमकी देऊन बिअरच्या बाटल्या आणि रोख रक्कम पळवली

0
2041

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – बंदुकी सारखी वस्तू दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बिअर शॉपीच्या मालकाकडून १ हजार ६०० रुपये किमतीच्या दहा बियरच्या बाटल्या आणि रोख ४ हजार ५०० रुपये एकाने जबरदस्तीने चोरुन नेले. ही घटना सोमवारी (दि.१२) रात्री अकराच्या सुमारास थेरगाव येथील तापकीर चौक शनि मंदीरासमोर असलेल्या न्यु खुशबु बियर शॉपी या दुकानात घडली.

याप्रकरणी शॉपीचे मालक जीतु राजपाल गिडवाणी (वय २९, रा. झुलेलाल कॉम्पलेक्स, लिंकरोड, पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बज्या उर्फ बजरंग रमेश वाघेरे (वय २८, रा. पिंपरीगाव) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गिडवाणी यांचे थेरगावात न्यु खुशबु नावाचे बियर शॉपीचे दुकान आहे. आरोपी बजरंग वाघेरे हा सोमवारी गिडवाणी यांच्या बियर शॉपीवर गेला. तेथे त्याने  गिडवाणी यांना बंदुकी सारखी वस्तू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच १ हजार ६०० रुपये किमतीच्या दहा बियरच्या बाटल्या आणि रोख ४ हजार ५०० रुपये जबरदस्ती चोरुन नेले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बजरंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एच.व्ही.माने तपास करत आहेत.