थर्टीफस्टच्या रात्री पिंपरी-चिंचवड शहरात दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या ११९ तळीरामांवर कारवाई

0
1061

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – थर्टीफस्टच्या रात्री पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दारुन पिऊन वाहन चालवणाऱ्या ११९ तळीरामांवर वाहतुक विभागाच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. रविवारी (दि.३०) डिसेंबर पासूनच पिंपरी-चिंचवड शहर परिसरात ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांची करडी नजर होती.

यंदा पोलिसांनी मागील वर्षाच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडच्या निगडी, चिंचवड, चाकण, भोसरी, पिंपरी, हिंजवडी, दिघी, देहुरोड आणि तळवडे या नऊ वाहतूक विभागांमध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये शहर परिसरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर नाका बंदी करुन वाहन चालकांची तपासनी करण्यात आली. या कारवाई दरम्यान,  रविवारी (दि.३० डिसेंबर) रोजी १२७ तर सोमवारी (दि.३१ डिसेंबरला) ११९ तळीरामांवर कारवाई करण्यात आली.

मात्र दिघी वाहतुक विभागाकडे वाहन चालकांची चाचणी घेण्यासाठी “ब्रीदअलायजर” ही मशीन नसल्याने तेथे कारवाई करण्यात आलेली नाही असे पोलिसांच्या अहवालात नमुद केले आहे.