‘त्या’ दिवशी भिडे गुरुजी कोरेगाव-भीमा येथे नव्हते ; खासदार उदयनराजेंची पाठराखण

0
598

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी  शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजींवर अनेकांनी आरोप केले आहेत. परंतु त्या दिवशी भिडे गुरुजी कोरेगाव-भीमा येथे नव्हते, असा दावा साताऱ्याचे राष्ट्रवादीचे  खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

उदयनराजे म्हणाले की, भिडे गुरुजीबद्दल कोण काय म्हणते, हे मला माहीत नाही, पण मला इतके माहीत आहे, कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार झाला तेव्हा, भिडे गुरुजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगलीतील घरी होते. पाटील यांच्या घरात एक दुःखद घटना घडली होती. भिडे गुरुजी त्याच ठिकाणी होते. ते काय देव नाहीत, एकाच वेळी दोन ठिकाणी हजर असायला.

गुरुजी वडिलधारे आहेत. आपले भाग्य आहे  की गुरुजींसारख्या लोकांचा आपल्याला सहवास लाभला आहे. गुरुजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप काम केले आहे. त्यांनी राबवलेल्या गडकोट मोहिमा कौतुकास्पद  असल्याचे उद्यनराजे म्हणाले.