आणीबाणी लागली नसती, तर आम्ही राजकारणात आलो नसतो – नितीन गडकरी

0
483

नागपूर, दि. ७ (पीसीबी) –  देशात आणीबाणी लागल्यानंतर आमचा राजकीय प्रवास सुरू झाला. जर आणीबाणी लागली नसती, तर आम्ही राजकारणामध्ये आलो नसतो. त्यामुळे मी देशातील आणीबाणीचे प्रॉडक्ट आहे, असे भाजप नेते व केंद्रीय मंत्री   नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

नागपुरात ‘नितीन गडकरी, दोस्तों के बीच’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

गडकरी म्हणाले की, महाविद्यालयात गेल्यानंतर पहिल्याच वर्षात देशात आणीबाणी लागू झाली. त्यावेळी सगळेच सरकारच्या बाजूने बोलत होते. मात्र आम्ही आंदोलने व लाठ्या खाल्ल्या. सहकाऱ्याच्या स्कूटरवरुन फिरुन अर्धा कप चहा घ्यायचो.

हल्ली राजकारण म्हणजे काळी-पिवळी टॅक्सी झाली आहे. कुणीही कुठेही जात आहे. पक्षात कोण येते, का पक्ष सोडतोय, हे कुणाला काही माहित नाही. विचारधारेबाबत असलेली एकनिष्ठता कमी होत चालली आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.