त्याला मारले असेल तर चांगलेच केले असे विकृत ठेचले पाहिजे – रुपाली ठोंबरे

0
718

 

पुणे, दि.९ (पीसीबी) – एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. एकीकडे भाजपाकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात असताना मनेसकडून मात्र जितेंद्र आव्हाड यांचं समर्थन करण्यात आलं आहे. मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू मांडताना विकृत पोस्ट केली म्हणून मारले असेल तर चांगलंच केले असे म्हटले आहे.

रुपाली ठोंबरे यांनी म्हटले की, “अरे काहीही पोस्ट, कमेंट..काही करणार का. सोशल मीडिया आहे आपल्या विकृतीचे साधन नाही हो. चांगले घ्या की सोशलमधून. बरी विकृती करायला हात, मन धजावते कसे. मंत्री असो, सेलिब्रिटी असो की कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी… कमेंट विकृत करूच नये आणि केली तर विकृतीप्रमाणे मार खावा. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत जी काही विकृत पोस्ट केली म्हणून त्याला मारले असेल तर चांगलेच केले असे विकृत ठेचले पाहिजे. सोशल मीडियावर ही विकृती संपवली पाहिजे,”

अरे काहीही पोस्ट ,कॉमेंट। काही करणार कासोशल मीडिया आहे आपल्या विकृतीचे साधन नाही हो. चांगले घ्या की सोशल मधून ,बरी…

Gepostet von Rupali Patil Thombare am Dienstag, 7. April 2020