या आठ प्रश्नांची उत्तरे अमित शाह देणार का?

0
326

 

मुंबई, दि.९ (पीसीबी) – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आठ प्रश्न विचारले आहेत. आता या प्रश्नांची उत्तरे अमित शाह देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अनिल देशमुख यांनी विचारलेले आठ प्रश्न

१) केंद्रात गृह मंत्रालयाने निजामुद्दी, दिल्लीमध्ये तबलिगी मरकजच्या इज्तेमाचं आयोजन करण्यासाठी परवानगी का दिली?

२) निजामुद्दीन मरकजच्या शेजारीच निजामुद्दीन पोलीस स्टेशन आहे. असं असूनही हे आयोजन थांबवलं का गेलं नाही ? यासाठी गृह मंत्रालय जबाबदारी नाही का?

३) ज्या पद्धतीने मरकजमध्ये इतकी गर्दी झाली व करोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव राज्यांमध्ये झाला त्याला केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का?

४) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवल यांना रात्री दोन वाजता मरकजमध्ये का पाठवण्यात आलं? हे काम डोवल यांचं आहे की दिल्ली पोलीस आयुक्तांचं?

५) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे तबलिगचे पुढारी मौलाना साहाब रात्री दोन वाजता मरकजमध्ये काय गुप्त यंत्रणा करत होते?

६) अजित डोवल आणि दिल्ली पोलीस आयुक्त या दोघांनीही या विषयावर बोलणं का टाळलं?

७) कोणाशी याचे संबंध आहेत?
मरकजच्या आयोजनाची परवानगी तुमची..

८) कार्यक्रम तुम्ही रोखला नाहीत
तबलिगींशी संबंध तुमचे.. या सर्व प्रश्नांचे उत्तर देणार कोण?