…त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात, पोलिसांवर ताण येणार – आशिष शेलार

0
388

मुंबई, दि.१८ (पीसीबी) – आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई नाईट लाईफला २६ जानेवारीपासून मुंबईत सुरवात होत आहे . यामुळे मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंबंधीच्या बोलावलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

या बैठकीत मनपा आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे अधिकारीही उपस्थित होते.

व्यापार वाढीसाठी २४×७ माँल सुरु ठेवणे हे केलेही पाहिजे पण त्याच गोंडस नावाने रात्रभर बार, लेडिजबार, पब सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात, पोलिसांवर ताण येईल. छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करु शकतात. निवासी भागात हाँटेल,पब सुरु ठेवण्यास आमचा विरोधच आहे’ असं आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे.