मावळ मध्ये सुनिल शेळकेंची विजय घोडदौड चालू

0
685

मावळ, दि.१८ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वार्ड क्र.१ मध्ये होत असलेल्या भाजपाचे युवा कार्यकर्ते निखिल भगत व स्वप्नीता भगत यांनी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी प्रणित जनसेवा विकास समिती आणि शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केले. भगत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निच्छित झाली आहे.

आमदार सुनिल शेळके यांचे चुलत बंधू भाजपचे नगरसेवक संदिप शेळके यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवणूक होत आहे. अर्ज भरल्यानंतर  आमदार सुनिल शेळके यांनी निखिल भगत यांचे अभिनंदन केले. यावेळी बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, किशोर आवारे, गणेश खांडगे, गणेश काकडे, यादवेंद्र खळदे, चंद्रभान खळदे, सुलोचनाताई आवारे, रविंद्र आवारे, संतोष भेगडे, उल्हास भगत, संदिप गराडे, संदिप शेळके, आशिष खांडगे, सुशिल सैंदाणे, अनिकेत भेगडे, आशिष खांडगे व इतर मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक संतोष भेगडे यांनी उपस्थितांचे विशेष आभार मानले.