तुम्ही कोणताही धंदा करा, पण १ नंबरचा करा, २ नंबरचा नाही – अजित पवार

0
530

पुणे, दि. ३ (पीसीबी) – काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील तरूणांसाठी असलेल्या योजनांवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,  युवकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी३ वर्ष कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही.  पण तुम्ही कोणताही धंदा करा, मात्र धंदा १ नंबरचा करा, २ नंबरचा नाही. नाहीतर परवानगी मिळणार नाही, असे पवार म्हणाले.

बारामती मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुण्याचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी नरपतगिरी चौकात सभा घेत काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी सभेत बोलताना पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली.

यावेळी पवार म्हणाले की, आमच्या पक्षात काय चाललंय हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठरवतील.  पंतप्रधान मोदी यांनी पवार कुटुंबियांची चिंता न करता समाजाची करावी.  मोदी यांनी विरोधकांवर टीका करण्यापेक्षा गरीबांना न्याय देण्याची भुमिका घेतली असती, राफेल विमान खरेदीची शंका डोक्यातून काढली असती, तर  बरे झाले असते, असा टोला पवार यांनी यावेळी लगावला.