तुमचे मत तुम्हाला मजबूत करणारे शस्त्र – प्रियंका गांधी

0
499

गांधीनगर, दि. १२ (पीसीबी) – तुमचे मत तुम्हाला मजबूत करणारे शस्त्र आहे, असे समजून मतदान करा, असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज (मंगळवार) येथे मतदारांना केले.  येणाऱ्या दिवसात योग्य प्रश्न विचारा, हा तुमचा देश आहे तुम्ही या देशाला घडवले आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार होते, त्याचे काय झाले? असा प्रश्न करून ज्यांनी तुम्हाला आश्वासने दिली. त्यांना प्रश्न विचारण्यास शिका, असेही आवाहन प्रियंका गांधी यांनी यावेळी केले.

देशात सध्या जे काही सुरु आहे, ते चांगले नाही. हे वातावरण आपल्या देशासाठी योग्य नाही. देशात स्त्रिया सुरक्षित नाहीत. देशात रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळे देश अपेक्षेने बदलाकडे पाहत आहे, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.