तुझ्यासारखा नमक हराम पूर्ण दुनियेत सापडणार नाही; मोदींवर टीका करताना बच्चू कडूंची जीभ घसरली

0
1004

नाशिक , दि. २४ (पीसीबी) – तुझ्यासारखा नमक हराम पूर्ण दुनियेत सापडणार नाही, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. नाशिकच्या सिन्नर फाट्यावरील उपकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली कांदा परिषदेचे आज (रविवार)  आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.  

बच्चू कडू म्हणाले की, सरकार कोणाचेही असो आम्ही मे महिन्यात कांदा जीवनावश्यक वस्तूमधून वगळावा या मागणीसाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांना मोजके शेतकरी नेऊन घेराव घालणार आहेत.  येत्या २ दिवसात आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊ आणि कांद्याच्या प्रश्नावर योग्य निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मी तुमचा कांदा खाल्ला आहे, त्यामुळे माझे सरकार आले. म्हणून मी तुमचे नुकसान होऊ देणार नाही, असे मोदी नंदुरबारच्या सभेत बोलले होते. आता याची  मोदींला  आठवण करून द्यावी लागणार आहे. तुझ्यासारखा नमक हराम पूर्ण दुनियेत सापडणार नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर तोफ डागली.