आमच्या छाताडावर पाय देऊन पुढे जाऊ नका; पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीला खोचक सल्ला

0
844

इंदापूर , दि. २४ (पीसीबी) –  महाआघाडी ही सन्मानपूर्वक असावी, काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे, सोबतच मित्रपक्षही वाढवा. आमचा गळा कापून किंवा आमच्या छाताडावर पाय देऊन पुढे जाऊ नका, असा खोचक सल्ला काँग्रेसचे नेते व  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी  आज (रविवार) राष्ट्रवादीला दिला.

इंदापूर नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभप्रसंगी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.  या कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आदी उपस्थित होते.

दरम्यान, आम्ही लोकसभेत आघाडी धर्म पाळून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करतो. मात्र राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीत नेहमीच दगाफटका होतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेची जागा कोणत्या पक्षाला हे जाहीर करावे. अन्यथा आम्ही लोकसभेत आघाडीचे काम करणार नाही, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी चव्हाण यांच्यासमोर मांडली.