तुकाराम बीज पुण्यतिथी म्हणून उत्साहात, मात्र तुकोबारायांची जयंती साजरी केली जात नसल्याची खंत.- ह.भ.प. सुशेन महाराज नाईकवाडें

0
591

पिंपरी दि. ४ (पीसीबी) – मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जयंती भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भक्ती शक्ती येथील समूह शिल्पासमोर फुले वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवकीर्तनकार ह.भ.प. सुशेन महाराज नाईकवाडे म्हणाले की संत तुकाराम महाराज हे निर्भीड संत व विद्रोही कवी होते. संत तुकाराम महाराजांचे विज्ञानवादी विचार हे खेडोपाड्यात पोहाचले पाहिजेत. त्यांनी दाखवलेला मानवतावादी विज्ञानवादी तुकाराम महाराजांचे दृष्टिकोन जनमाणसात पोहचायला हवा आणि यातून संत तुकाराम महाराज यांचे महान कार्य जनतेसमोर घेऊन गेले पाहिजे.

संत तुकोबारांयाची शिकवण ही समतेवर आणि मानवतेच्या प्रेमावर आधारित आहे. दोन फेब्रुवारी १६०८ ही तुकाराम महाराजांची जन्म तारीख आहे म्हणून या दिवशी संत तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली पाहिजे, परंतु त्यांची पुण्यतिथी म्हणजे तुकाराम बीज उत्साहात साजरी केली जाते.
आणि आशा महान क्रांतिकारी संताच्या जयंती चा विसर आज पडलेला दिसून येत आहे. परंतु या कार्याची सुरुवात मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या कडून झाली याच कौतुक नाईकवाडे महाराजांनी केले.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले यामध्ये संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हाकार्याध्यक्ष लहू लांडगे, मराठा सेवा संघांचे गजानन आढाव, छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, मंगेश चव्हाण, जगद्गुरु संत तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष बादाडे, इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा सचिव गणेश कुंजीर, जिल्हा संघटक रशीद सय्यद, शहर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोभे, संजय जाधव शहर उपाध्यक्ष नितीन जाधव, सतीश कदम, संघटक गजानन वाघमोडे, नितीन भोसले महेश कांबळे, व्हीबीवीपीचे प्रदेश उपाध्यक्ष नकुल भोईर, छावा मराठा युवा महासंघाचे राजेंद्र देवकर, गणेश सरकटे, राजू पवार, मराठा क्रांती मोर्चाचे निलेश शिंदे, सागर तापकीर, विशाल जाधव अभिषेक म्हसे, नितीन इंगवले, निलेश खैरे, अतुल वर्पे, नरेंद्र पवार, गाथा परिवाराचे शिवाजीराव धुमाळ, देवराम कोठारी, निरंजनसिंह सोखी, सनी पवार इत्यादी मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे महानगरअध्यक्ष सतिश काळे यांनी केले तसेच प्रस्तावना अनिल सावंत यांनी केली तर आभार जीवन बोऱ्हाडे यांनी मानले.