दि.१४(पीसीबी)नाशिक शहरात आता रोज गुन्हेगारीच्या भयंकर घटना सातत्याने समोर येत असल्याने घबराट आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमध्ये अशोक खरातच्या व्यभिचाराचे प्रकरनामुळे देशभरात खळबळ उडाली. पाठोपाठ रवींद्र एरंडे प्रकरण तसेच एका मोठ्या आयटी कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाने खळबळ उडाली.आता सोमवारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये भर दिवसा एका तरुणाची धारदार शस्त्राने म्हणजेच कोयत्याने हत्या करण्यात आली आहे.
एका महिलेने तोंडाला स्कार्फ बांधून तरुणाला कोयत्याने वार करुन संपवलं आहे. विशेष म्हणजे ही थरारक घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओ बनवणाऱ्यांनी आरोपी माहिती नसताना लपवून हा व्हिडीओ बनवला असल्याची शक्यता आहे. पण या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेनंतर भर दिवसा अशाप्रकारे खूनाची घटना समोर आल्याने नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.














































