तळवडे परिसरात समविषम तारखेस पार्किंगचे निर्बध

0
303

पुणे दि.17 (पीसीबी): – पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरीता तळवडे वाहतुक विभागांतर्गत पिंपरी चिंचवड शहर अत्यावश्यक सेवेतील वाहने ( उदा. फायरबिग्रेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका,इ.) वगळता देहूगाव मुख्य कमान ते आंबेडकर चौक येथे समविषम तारखेस पार्किंग या ठिकाणी सम – विषम तारखेस पार्किंगचे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच आंबेडकर चौक ते मुख्यमंदिर व तालिम ते शिवाजी चौक येथील रस्तयावर नो पार्किंग झोन अशा प्रकारचे निर्बध घालण्यात आल्याची माहिती पिंपरी- चिंचवड वाहतुक शाखेचे पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली आहे.