…तर ‘ईडी’ला ‘कृष्णकुंज’वर येऊन उत्तर द्यावे लागेल; मनसेचा इशारा

0
479

नाशिक, दि. २७ (पीसीबी) – मराठी फलकासंदर्भात ‘ईडी’ने उत्तर द्यावे ही अपेक्षा आहे. परंतु, उत्तर दिले नाही, तर ‘ईडी’ला ‘कृष्णकुंज’वर येऊन उत्तर द्यावे लागेल, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

कोहीनूर मिल प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिवसभर चौकशी करणाऱ्या ‘ईडी’ला मनसेकडून मराठीत फलक नसल्याबद्दल नोटीस पाठविण्यात आली आहे. परंतु या नोटीशीला अद्यापही कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

त्यामुळे या नोटिसीला ‘ईडी’कडून उत्तर मिळणे अपेक्षित आहे. ‘ईडी’ने नियम पाळणे आवश्यक आहे, असेही देशपांडे यांनी यावेळी म्हटले आहे. मात्र, ‘ईडी’ने अपेक्षित उत्तर दिले नाही, तर मात्र ‘ईडी’ला कृष्णकुंजवर येऊन उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही देशपांडे यांनी यावेळी दिला.