धक्कादायक: नांदेडच्या मनसे जिल्हा प्रमुखाची गळफास घेत आत्महत्या

0
396

नांदेड, दि. २७ (पीसीबी) – जिल्ह्याचे मनसे जिल्हाप्रमुख संभाजी जाधव (वय ४६) यांनी सोमवारी रात्री राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना तरोडा नाका परिसरात घडली.

संभाजी जाधव हे विद्यार्थी काळापासून राज ठाकरे यांच्या संपर्कात होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापित केला तेव्हा संभाजी जाधव यांनीही शिवसेना सोडली होती. त्यावेळी ते विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करत होते. शेतकरी असलेले संभाजी जाधव यांच्या शेतीवरील कर्ज वाढले होते. नांदेडच्या डौर गावचे संभाजी जाधव रहिवासी होते. या गावातच त्यांची वडिलोपार्जित जमीन आणि शेती होती. त्यांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शेतीवर विसंबून होता. परंतु, गेल्या काही वर्षांपासून सततच्या दुष्काळाने शेतीवरील कर्ज दिवसेंदिवस वाढत गेले. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.