ढाक बहिरीच्या सुळक्यावरून वरून पडल्याने एका ट्रेकरचा मृत्यू

0
313

मावळ ,दि ६ (पीसीबी) :- बहिरीच्या सुळक्यावरून वरून पडल्याने एका ट्रेकरचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. प्रतिक आवळे ( (रा. औरंगाबाद ) असे मृत्युमुखी पडलेल्या ट्रेकरचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, लोणावळा जवळ कर्जत आणि मावळ तालुक्याच्या मध्यावर ढाक-बहिरी हा उंच सुळका आहे. या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी प्रतीक आणि त्याचे साथीदार औरंगाबादहून आले होते. ढाक बहिरीच्या सुळक्यावर गेल्यानंतर प्रतीक याचा तोल गेल्याने तो खाली पडला आणि यात त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच स्थानिक गावकरी आणि यशवंती हायकर्स खोपोलीची टीम ढाक-बहिरी सुळक्या जवळ पोचली. त्यानंतर अथक प्रयत्न करून काळोख आणि पाय वाट तसेच डोंगर उतार व कड्याच्या बाजूचा अरुंद जागेतून पहाटे साडेतीन वाजता प्रतीकचा मृतदेह बाहेर काढला.