डॉ. संदीप बाहेती यांच्या ‘जगा व जगू द्या’ पुस्तकाचे वृक्षप्रेमींना वाटप; बिट निरिक्षकांनी लावली १५० झाडे

0
561

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या पाजळपोळ येथील मोकळ्या जागेत महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या बिट निरिक्षकांनी वृक्षारोपण केले. त्यावेळी बिट निरिक्षक दशरथ वाघोले यांनी डॉ. संदीप बाहेती यांच्या ‘जगा व जगू द्या’ या १५० पुस्तकांचे वृक्षप्रमींना वाटप केले.

त्याप्रसंगी वखार महामंडळाचे नायब तहसीलदार परदेशी, माजी महापौर नितीन काळजे, विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे व शिरीष पोरेड्डी, कनिष्ठ अभियंता राजेंद्र डुंबरे व दामू तापकीर बिट निरिक्षक अमोल पाचांगणे, अमित शिंदे, आकाश रायमाने, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. लावलेली सर्व १५० झाडे देशी पिंपळाची आहेत.