डेयरीवाल्याने तुमच्याशी दुध घेण्याचा करार केला तर तो तुमचं जनावर घेऊन जातो का?

0
222

कच्छ, दि. १५ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (15 डिसेंबर) गुजरातमधील कच्छ येथे अनेक योजनांचं उद्घाटन केलं. ते एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. देशात सुरु असलेला शेतकरी मोदी कच्छमधील शेतकरी समुहांशिवाय गुजरातच्या शिख शेतकऱ्यांच्याही भेटी घेणार आहेत. ते या ठिकाणी देखील काही योजना सुरु करतील, अशी माहिती आहे. डेयरीवाल्याने तुमच्याशी दुध घेण्याचा करार केला तर तो तुमचं जनावर घेऊन जातो का?, असा सवाल उपस्थित करून शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू असल्याची टीका मोदी यानी केली.

पंतप्रधान मोदी कच्छमध्ये सोलर पार्कसह अनेक योजनांची सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, “शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे त्यांच्या जमिनीवर दुसरे ताबा घेतील अशी भीती शेतकऱ्यांना दाखवली जात आहे. एखाद्या डेयरीवाल्याने तुमच्याशी दुध घेण्याचा करार केला तर तो तुमचं जनावर घेऊन जातो का? धान्य आणि दाळी उत्पादन करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना त्यांचं पीक विकण्याचं स्वातंत्र्य का मिळायला नको असा प्रश्न देश विचारत आहे. शेतीत सुधारणा करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अनेक शेतकरी संघटनांनी देखील शेतीमाल कुठेही विकण्याचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करत होते. ”

“आज जे लोक विरोधी पक्षात बसून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत ते देखील आपल्या कार्यकाळात या सुधारणांचं समर्थन करत होते. ते शेतकऱ्यांना केवळ खोटे आश्वासनं देत राहिले. आता देशाने काही पावलं उचलली आहेत तर ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. मी शेतकरी भावा-बहिणींना हेच सांगेल ती सरकार तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान काढेल, त्यासाठी सरकार 24 तास तयार आहे. शेतकऱ्यांचं हित पहिल्या दिवसापासून आमचं प्राधान्य राहिलं आहे,” असं मोदी म्हणाले.
“कोटेश्वर महादेवाच्या आशीर्वादाने कच्छ बदललं आहे. कोरोनाने नक्कीच जग बदललं, मात्र कच्छचा रणउत्सव आजही जगाला आकर्षित करतो. भारत सरदार पटेलांचं स्वप्न पूर्ण करत आहेत,” असंही मोदींनी नमूद केलं.