ठोस पुराव्याअभावी महाराजांवर सध्यातरी कारवाई करू शकत नाही – डॉ. प्रदीप मुरंबीकर

0
372
नगर, दि.२१ (पीसीबी) – निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी केलेल्या वक्तव्याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही, ज्या माध्यमांनी महाराजांनी केलेल्या वक्तव्याची बातमी छापली होती, त्यांना नोटीस देण्यात आली असून, त्यांनी पुरावा दिल्यास त्या पुराव्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, इतर कोणाची तक्रार असल्यास त्याबाबत पुरावे द्यावेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.
इंदोरीकर महाराजांची वक्तव्य ज्या माध्यमांनी बातमी स्वरुपात दिली होती, त्यांना आम्ही नोटिस बजावल्या आहेत. जर त्या माध्यमांनी आम्हांला त्या वक्तव्याचा पुरावा दिला तर आम्ही त्या पुराव्यांची शहानिशा करून योग्य ती कारवाई करू, परंतु इंदोरीकर महाराजांनी दिलेल्या खुलाशानुसार आणि कोणत्याही पुराव्याअभावी महाराजांवर सध्यातरी कारवाई करू शकत नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्पष्ट केले.