ठाकरे सरकारने ७० हजार पेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे

0
759

मुंबई, दि.३० (पीसीबी) -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेतच स्थलांतरित मजुरांना स्थलांतर करु नका. तुम्ही आहेत तिथेच थांबा तुमची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करु असं आश्वासन दिलं होतं. ज्यानंत काही वेळात ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात २६२ निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये स्थलांतरिक कामगार, बेघर लोक राहू शकतात. त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ठाकरे सरकारने ७० हजार पेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या सगळ्यांसाठी २६२ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे