ठाकरेंच्या `मार्मिक`चे ६२ व्या वर्षांत पदार्पन; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी सोहळा

0
423

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : बाळासाहेब ठाकरे…व्यंगचित्रकार, हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख! ज्यांचं वक्तृत्व अनेकांच्या मनाचा ठाव घेत होतं. तर त्यांची व्यंगचित्र लोकांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडायची. त्यांची व्यंगचित्रं म्हणजे सामाजिक राजकीय विषयांवर केलेलं ‘मार्मिक’ भाष्य… बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकार म्हणून जगभर कीर्ती मिळवली. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘द फ्री प्रेस जर्नल’मधून आपल्या व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. काही दिवसांतर त्यांची व्यंगचित्रं ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्येही येऊ लागली. मग 1960 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी नोकरी सोडून ‘मार्मिक’ नावाचं स्वतःचं साप्ताहिक सुरू केलं. त्याचा आज बासष्ठावा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने ट्विट करण्यात आलं आहे. “थोर व्यंगचित्रकार, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अमर झालेल्या ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाचा आज 62 वा वर्धापन दिन”, असं ट्विट शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं आहे.

शिवसेनेचं ट्विट
मार्मिक या साप्ताहिकाचा आज वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त शिवसेनेने ट्विट केलं आहे. “थोर व्यंगचित्रकार, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अमर झालेल्या ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाचा आज 62 वा वर्धापन दिन”, असं ट्विट शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’मधून मराठी माणसावरील अन्यायावर भाष्य केलंय. त्यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्याने तत्कालीन सरकारला सळो की पळो कंल. त्याच ‘मार्मिक’चा 62 वा वर्धापन दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘मार्मिक’चे वाचक, शिवसैनिक आणि जनतेला मार्गदर्शन करणार आहेत. संध्याकाळी 6.30 वाजता फेसबुक आणि यूटयुब लाईव्हच्या माध्यमातून ते संवाद साधणार आहेत.

सध्याची राजकीय स्थिती, केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारी चौकशी यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलणार आहेत. राजकारणाला कोणती दिशादेखील ते स्पष्ट करणार आहेत. या सोहळय़ाला ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, व्यंगचित्रकार संजय मिस्त्री आणि प्रबोधन प्रकाशनचे विश्वस्त, शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत.