ट्रान्सपोर्ट वाहनातील मालाचा अपहार केल्या प्रकरणी एकास अटक

0
122

कंपनीतून डिस्ट्रीब्यूटर लोकांना देण्यासाठी भरलेल्या मालातील काही माल काढून त्याचा अपहार केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मे 2023 ते 16 एप्रिल 2024 या कालावधीत टोल इंडिया प्रा ली, महाळुंगे या कंपनीत घडली.

शेषराव जिभाऊ निकम (वय 25, रा. सावरगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह समाधान युवराज बागुल (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शांताराम नारायण झांबरे (वय 45, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड, पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झांबरे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांची वाहने महाळुंगे येथील टोल इंडिया प्रा ली या कंपनीत ट्रान्सपोर्टसाठी लावण्यात आली आहेत. कंपनीतून झांबरे यांच्या वाहनांमध्ये डिस्ट्रीब्यूटर लोकांना देण्यासाठी बॉक्स भरून ठेवले होते. त्यातील 80 हजार रुपये किमतीचे आठ बॉक्स आरोपींनी काढले. त्यातील हार्पिक, डेटॉल साबण आणि इतर वस्तूंचा अपहार करून तो परस्पर कोणाला तरी दिला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.