टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0
283

रहाटणी, दि. ९ (पीसीबी) – भरधाव वेगातील टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रहाटणी येथे शनिवारी (दि. 8) दुपारी घडली.

बलवंत लहू सुरवसे (वय 28, रा. गजानन नगर, काळेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची बहिण ज्योती दत्तात्रय श्रीमंगले (वय 38, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (जी जे 38 / टी 7268) या टेम्पोवरील चालक सुखाभाई जीवाभाई गमरा (वय 36, रा. अहमदाबाद, गुजरात) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योतिचा यांचा भाऊ बलवंत हे आपल्या दुचाकीवरून चालले होते. शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बलवंत हे रहाटणी येथील थोपटे लॉन्सजवळ आले असता भरधाव वेगातील टेम्पोने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बलवंत यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.