ज्येष्ठ गायक मोहम्मद अझीझ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
836

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – ज्येष्ठ गायक मोहम्मद अझीझ (वय ६४) यांचे मुंबईतील नानावटी रूग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज (मंगळवार) निधन झाले. सोमवारी रात्री त्यांचा कोलकाता येथे एक कार्यक्रम होता. मंगळवारी दुपारी ते मुंबई विमानतळावर पोहचले. त्यावेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली.  त्यांना तातडीने नानावटी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच  त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबबईत  बुधवारी  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  

मोहम्मद अझीझ यांचा जन्म २ जुलै १९५४ ला पश्चिम बंगालच्या अशोक नगरमध्ये झाला होता. ‘दिल बहलता आपके आ जाने से’ या गाण्यामुळे अझीझ घराघरात पोहचले. १९८२ मध्ये गायक मोहम्मद अझीझ मुंबईत आले होते. मर्द टांगेवाला हे गाणे गाऊन त्यांनी अमिताभ बच्चन यांनाही आवाज दिला. हे गाणे मला मिळाले हा माझ्यासाठी भाग्याचा प्रसंग आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.