जिल्हा न्यायाधिशाचा मुलासह नागपुरात संशयास्पद मृत्यू

0
294

बेतुल(मध्य प्रदेश),दि. २७ (पीसीबी) : मध्य प्रदेशातील बेतुल जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश व त्यांच्या मुलाचा महाराष्ट्रातील नागपूर येथे एका रुग्णालयात मृत्यू झाला. अन्नातील विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा संशय आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रद्धा जोशी यांनी सांगितले की, बेतुलचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र त्रिपाठी (वय ५६) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला.तत्पूर्वी त्यांचा मुलगा अभियानराज (वय ३३) याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायाधीश व त्यांचे पुत्र यांनी २० जुलै रोजी कुटुंबीयांसमवेत जेवण केले. त्या दोघांनी पोळ्या तर त्यांच्या पत्नीने केवळ भात सेवन केला. नंतर २३ जुलैस न्यायाधीश व त्यांच्या मुलास स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले . प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना शनिवारी उपचारासाठी नागपूरला नेले होते. पोळ्यांच्या पीठाच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे.