…आणखी ४७ अ‍ॅपवर बंदी

0
277

मुंबई , दि. २७ (पीसीबी) : भारताने पुन्हा एकदा 47 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे 47 अ‍ॅप काहीदिवसांपूर्वी बंदी घातलेल्या अ‍ॅपचा क्लोनप्रमाणे काम करत होते. भारताने यापूर्वी 59 चिनी अ‍ॅप बॅन केले ज्यामध्ये काही प्रसिद्ध अ‍ॅपही होते. त्यानंतर आता पब्जी आणि अली एक्सप्रेसचाही नंबर लागणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

यापूर्वी बंदी घातलेल्या अ‍ॅपमध्ये टिक टॉक, वी चॅट, अली बाबा यूसी न्यूज आणि यूसी ब्राऊझरचाही समावेश होता. 250 असे चिनी अ‍ॅप आहेत ज्यांच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे यांची चौकशीही केली जाऊ शकते.

चिनी अ‍ॅप बॅन करण्यासाठी एक नवीन यादी तयार केली जात आहे आणि यामध्ये काही टॉप गेमिंग अ‍ॅप्सचाही समावेश आहे. त्यामुळे लवकरच भारतात प्रसिद्ध झालेले काही चिनी गेम्सवरही बंदी घातली जाऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी 200 पेक्षा अधिक अ‍ॅपची यादी तयार केली जात आहे. ज्यामध्ये पब्जी आणि अली एक्सप्रेससारखे प्रसिद्ध अ‍ॅप आहेत. भारतात या अ‍ॅप्सचे कोटींमध्ये युझर्स आहेत.

हे चिनी अ‍ॅप भारतातील डेटा चीनसोबत शेअर करत आहेत आणि त्यामुळे सरकारी ऐजन्सीकडून या अ‍ॅपचे रिव्ह्यू केले जात आहे. सध्या सरकारकडून नवीन अ‍ॅपवर बंदी घालण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
दरम्यान, पब्जी अ‍ॅपचेही चीनसोबत संबंध आहे. पण हे अ‍ॅप पूर्णपणे चिनी अ‍ॅप म्हणू शकत नाही. त्यामुळे पब्जी अ‍ॅपवर बंदी घालणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.