जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन

0
515

दांडिया-गरबासोबत महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन – सिमा सावळे

पिंपरी दि.२६ (पीसीबी) – जिजाई प्रतिष्ठान यंदा नवरात्र उत्सवाच्या सातव्या वर्षात पदार्पण करत असताना दरवर्षी युवती व महिलांच्या कलागुणांना चालना मिळण्यासाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करत असते याही वर्षी कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर नवरात्राच्या दांडिया व गरबाच्या ठेक्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व मा.स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांच्यावतीने स्पाईन रोड भोसरी येथे करण्यात आले आहे.

● सोमवार २६ सप्टेंबर रोजी देवीची घटस्थापना व रांगोळी स्पर्धा

● मंगळवार २७ सप्टेंबर रोजी आई मुलगा/ मुलगी रॅम्प वॉक (फॅन्सी ड्रेस)

● बुधवार २८ सप्टेंबर रोजी डान्स स्पर्धा (वय वर्ष ५ ते १५)

● गुरुवार २९ सप्टेंबर रोजी पाककला स्पर्धा

● शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी महिला डान्स स्पर्धा (सोलो/ ग्रुप डान्स)

● शनिवार ०१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राची लोकधारा

● रविवार ०२ ऑक्टोबर रोजी फॅशन शो (महिलांसाठी/ ग्रुप)

● सोमवार ०३ ऑक्टोबर रोजी अंताक्षरी (ग्रुप)

● मंगळवार ०४ ऑक्टोबर रोजी होम हवन

● बुधवार ०५ ऑक्टोबर रोजी देवीचे विसर्जन

सदरील कार्यक्रम सेक्टर नंबर ०६ जलवायु विहाराशेजारील मैदान, स्पाईन रोड मोशी प्राधिकरण याठिकाणी सायंकाळी सहा वाजता सुरू होईल व स्पर्धात्मक कार्यक्रमानंतर दांडिया व गरबाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिमा सावळे यांनी दिली आहे.