जालन्यात सराईताचा धारदार चाकूने गळा चिरुन खून

0
820

जालना, दि. १६ (पीसीबी) – एका सराईत गुन्हेगाराचा धारदार चाकून गळा चिरुन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.१५) पहाटे चारच्या सुमारास जालना शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात घडली.

दत्ता चंद्रभान उढाण (वय ३०, रा. चंदनझिरा, जालना) असे मृत सराईताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता हा सोमवारी जालन्यातील चंदनझीरा भागातील मटन गल्ली येथे एका जागरणाच्या कार्यक्रमासाठी गेला होता. यावेळी त्याचे अज्ञात व्यक्तीसोबत वाद झाला. या वादातूनच त्याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे. मृत दत्ता विरोधात चंदनझिरा पोलिस स्टेशनसह कदीम, तालुका पोलिस ठाण्यातही चोरी, रॉबरी, लुटमार, दरोड्यासारख्या १२ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. जी. गिरासे यांनी दिली आहे. खून झाल्याची माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाची पाहणी करुन गुन्हा दाखल केला आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. चंदनझिरा पोलीस अधिक तपास करत आहेत.