जांबे मारहाण प्रकरण: आरोपींवर खुनाचा आणि अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी

0
817

हिंजवडी, दि. २६ (पीसीबी) – हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या जांबे येथे जुण्या भांडणाचा राग मनात धरुन चार जणांनी मिळून आडसूळ कुटूंबियांना लाकडी दांडके आणि तलवारीने जबर मारहाण केली होती. या घटनेत सुरेश अडसूळ (वय ५२) आणि त्यांचा मुलगा चिरायु हे गंभीर जखमी झाले होते. या घटनेचा धसका घेतल्याने सुरेश यांचा मंगळवारी (दि.२५) हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

हिंजवडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून पोलिसांनी घटनेतील आरोपी सुशांत गायकवाड, धर्मराज गायकवाड, चैतराम गायकवाड, आदित्य शिनगारे (सर्व रा. जांबे, मुळशी) या चार आरोपींना अटक करुन लगेचच जामिनावर सुटका केली. या गोष्टीचा धसका घेतल्यानेच सुरेश अडसूळ यांना  हृदय विकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप आडसूळ कुटूंबियांना केला आहे. यामुळे संबंधीत आरोपींवर खुनाचा आणि अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा अन्यथा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर तीव्र आंदोलन करु, असा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघ पिंपरी-चिंचवड शहर यांच्यावतीने पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे.