जम्मू-काश्मीरमधे बेपत्ता तिघा पोलिसांची हत्या

0
427

काश्मीर, दि. २१ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथून अचानक बेपत्ता झालेल्या चार पोलिसांपैकी तिघांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. तर, एकाची सुखरूप सुटका झाली आहे. हत्या झालेल्यांमध्ये दोन विशेष पोलीस अधिकारी व एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या तिघांचेही मृतदेह कापरन गावात आढळून आले. दहशतवाद्यांनी अपहरणानंतर त्यांची हत्या केल्याचे बोलले जातय.

‘हिजबुल मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेने अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील सर्व पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती. ‘हिजबुल’चा दहशतवादी रियाज नाइकू याने काही दिवसांपूर्वी ही धमकी दिली होती. यामुळे या हत्येमागे त्याचाच हात असावा असे बोलले जात आहे.