जमशेद बागवागार यांची श्रीलंकेतील अंतरराष्ट्रीय युवा परिषदेत निवड

0
641

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – माध्यम आणि संवाद या विषयाचे गाढे अभ्यासक तथा गुजरात राज्यातील युवा बोर्डमध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले जमशेद एन. बागवागार यांची श्रीलंका येथील “यौनपुरा द सिटी ऑफ युथ” या अंतरराष्ट्रीय युवा परिषदेत निवड झाली आहे.

श्रीलंकेच्या हमबनटोटा येथे २७ मार्च ते ३ एप्रिल २०१९ दरम्यान ही अंतरराष्ट्रीय युवा परिषद संपन्न होणार आहे. यावेळी जगभरातून एकूण ७ हजार विविध क्षेत्रातील युवा या परिषदेत सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. यंदाच्या या युवा परिषदेमध्ये भारतातील तीन तरुणांची निवड झाली आहे. त्यामध्ये जमशेद यांचे नाव असून युवा धोरण कसे असावे या विषयावर ते आपले मत मांडणार आहेत.