जन्माष्टमीच्या दिवशीच काळाचा घाला; पश्चिम बंगालमध्ये मंदिराचा भाग कोसळुन ४ जणांचा मृत्यू २७ जखमी

0
810

परागन, दि. २३ (पीसीबी) – पश्चिम बंगालमध्ये जन्माष्टमीच्या उत्सवाला गालबोटे लागले आहे. २४ उत्तर परागन जिल्ह्यातील कोचुआ गावातील बाबा लोकनाथ मंदिराचा काही भाग कोसळल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर २७ जण जखमी झाले आहेत.

आज पहाटेपासूनच या मंदिरामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी मंदिराचा भाग कोसळल्यामुळे नागरिक घाबरले आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपस्थित पोलिसांनी काही भाविकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना देखील बाहेर काढले आहे.  दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेचे शोक व्यक्त केला आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी ममता यांनी संबधित आधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.  मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची तर गंभीर जखमी झालेल्यांना एक लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रूपयांची मदत ममता पश्चिम बंगाल सरकारने जाहीर केली आहे.