छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम मार्गी, जिल्हाधिकारी यांची परवानगी

0
1565

पिंपरी, दि. 29 (पीसीबी): पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मधील भैरवनाथ मंदिर जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनस्थ  पुतळा बसविण्याच्या कामास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख याचे मार्फत मंजूरी देण्यात आली.याबाबत बोलताना वाघेरे म्हणाले की, पिंपरी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनास्थ पुतळा व्हावा ही सर्व ग्रामस्थ, शिवप्रेमी, व तरुण वर्गाची अनेक वर्षापासूनची इच्छा होती. तत्कालीन नगरसेविका श्रीमती सुनीता वाघेरे यांनी याबाबतचा  प्रस्ताव सन २०१२ साली  महापालिकेस दिलेला होता. परंतु हा विषय प्रशासनाच्या गलथानपणामुळे गेली कित्येक वर्ष रखडला गेला होता. परंतु २०१७ च्या निवडणुकीनंतर हा रखडलेला विषय हाती घेण्यात आला. याबाबतीत सातारा येथील शिल्पकार संजय कुंभार यांची सातारा येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन क्ले मॉडेलची पाहणी करून कामाची माहिती घेण्यात आली होती.

त्यानंतर कलासंचनालय मुंबई तसेच मुख्य वास्तुशास्त्रज्ञ मुंबई, पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्याशी संपर्क साधून प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती. या सर्व विभागांची परवानगी मिळालेनंतर जिल्हास्तरीय पुतळा समिति अध्यक्ष देशमुख याचेकडे प्रस्ताव मंजूरीसाठी देण्यात आला होता. दिनांक  २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी व महापालिका अधिकारी यांचे समवेत झालेल्या सभेमध्ये याविषयी सकारात्मक चर्चा होऊन आज डॉ. राजेश देशमुख यांनी शासकीय अटी व शर्थींच्या अधीन राहून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सिंहासनस्थ पुतळा बसविण्याच्या कामास मंजूरी दिली आहे. या मिळालेल्या मंजूरीमुळे पिंपरीगाव व परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शिवप्रेमी, तसेच तरुण मंडळी व जेष्ठ नागरिकांनी वाघेरे यांचे आभार मानले.

असे असेल पुतळ्याचे स्वरूप –
१) छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सिंहासनस्थ पुतळा जी किल्ले रायगडची प्रतिकृती असेल.
२) पुतळ्यासाठी उंच आकर्षक चबुतरा बांधण्यात येणार आहे
३) ब्रांझ धातुपासून पुतळा बनविण्यात येणार आहे तसेच पुतळ्याचे अंदाजे वजन १२०० किलोपर्यंत असणार आहे
४) पुतळ्याची ऊंची साधारणत: ८ फुट उंच असेल तर रुंदी अंदाजे ५ फुट ५ इंच असेल
५) पुतळ्यासाठी आकर्षक मेघडंबरी करण्यात येणार आहे. 
6) कामासाठी 83,10,333/- रुपयांचे कामाचे आदेश