चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्यांची शिक्षा   

0
433

मुंबई, दि. २२ (पीसीबी) –  बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्राला  चेक बाऊन्स प्रकरणी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मॉडेल पूनम सेठीच्या तक्रारीनंतर कोयनाला १.६४ लाखांच्या व्याजासह ४.६४ लाख रुपये देण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.

पूनम सेठीने २०१३ साली कोयना मित्राविरोधात तक्रार दाखल केली होती. बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे कोयनाने दिलेला चेक बाऊन्स झाला होता. कोयनाने  आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.   कोयनाने पूनमला  वेळोवेळी एकूण २२ लाख रुपये दिले होते. त्यापैकी ३ लाखांचा चेक बाऊन्स झाला होता. त्यानंतर पूनमने १९ जुलै २०१३ रोजी कोयनाला कायदेशीर नोटीसही बजावली होती. मात्र, तरीही रक्कम न दिल्यामुळे पूनमने १० ऑक्टोबर २०१३ रोजी कोयनाविरोधात  न्यायालयात दावा  दाखल केला होता.

दरम्यान, पूनम सेठी २२ लाख रुपये उधार देऊ शकेल, इतकी तिची ऐपतच नाही, असा दावा करून कोयनाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.  त्याचबरोबर पूनमवर आपले चेक चोरल्याचा आरोपही तिने केला. मात्र, कोयनाचे सर्व आरोप  न्यायालयाने  फेटाळून लावले.