चिंचवडमध्ये कोयत्याचा धाक दाखवून पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावला

0
430

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – रस्त्याने पायी चाललेल्या एका तरुणाला दुचाकीवरुन आलेल्या तिघा जणांच्या टोळक्यांनी कोयत्याचा धाक दाखवला. तसेच त्याचा ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेला. ही घटना शनिवारी (दि.२०) सकाळच्या सुमारास चिंचवड येथील मदर तेरेसा पुलाजवळ घडली.

याप्रकरणी अभिजीत निर्मलकुमार शहा (वय ३९, रा. जी ५, देवलिंग सोसायटी, लींक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळच्या सुमारास फिर्यादी अभिजीत हे चिंचवड येथील मदर तेरेसा पुलाजवळून पायी चालले होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या तिघा अज्ञात चोरट्यांनी अभिजीत यांना कोयत्याचा धाक दाखवला. तसेच त्यांचा ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेला. चिंचवड पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.