चिखली पोलीस ठाणे हद्दीतील सोसायट्या आणि शाळांमध्ये जनजागृती करुन पोलीसांनी बसवल्या तक्रार पेट्या

0
582

भोसरी, दि. १ (पीसीबी) – विविध अन्याय अत्याचार आणि गुन्ह्यांना वाचा फुटावी तसेच तक्रारदारांना तक्रार देण्यास सोईचे व्हावे म्हणून चिखली पोलीस ठाणे हद्दीतील विविध सोसायट्या आणि शाळांमध्ये तक्रार पेट्या बसवून पोलीसांनी विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांमध्ये तक्रार पेटी बाबत जणजागृती केली आहे.

पोलिसांनी चिखली पोलीस ठाणे हद्दीतील ज्ञानदिप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुपीनगर आणि सोनीगरा हाईट्स सोसायटी, त्रिवेणीनगर, तळवडे येथे या तक्रार पेट्या बसवल्या आहेत. तसेच कुठल्याही प्रकराची तक्रार असल्यास नागरिकांनी या तक्रार पेटीत तक्रार द्यावी असे आवाहन करुन तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे अश्वासन दिले आहे.