उदयनराजे आणि गोपीचंद पडळकर भेट; केवळ मागासवर्गीयांनाच आरक्षण कशाला? उदयनराजेंचा सवाल

0
2875

सातारा, दि. १ (पीसीबी) – प्रत्येक जातीला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला हवे. मंडल आयोगाने आरक्षण देताना बॅकवर्ड क्लास असे नमूद केलेले आहे. इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणजे सर्वांसाठी आरक्षण लागू होते. त्यामुळे सर्व जातीतील आर्थिक दुर्बलांना आरक्षण देणे गरजेचे आहे. केवळ मागासवर्गीयांनाच आरक्षण कशाला?, असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी या समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात या दोघांमध्ये झालेल्या चर्चेत पडळकर यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उदयनराजे यांच्याकडे पाठिंबा मागितला. त्यावर उदयनराजे यांनी आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाला माझा पाठिंबा आहेच का नसणार?, असा प्रश्न केला.

यावेळी उदयनराजे म्हणाले, “प्रत्येक जातीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला हवे. परंतु, मंडल आयोगाने घाणेरडापणा केला आहे. या आयोगाने मागासलेला असणाऱ्यालाच आरक्षण देण्याची शिफारस केली. आयोगाने आरक्षण देताना बॅकवर्ड क्लास असे नमूद केले होते. इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणता त्यावेळी आरक्षण हे सर्वांसाठी लागू झाले पाहिजे. सर्व जातीतील आर्थिक दुर्बलांना आरक्षण लागू व्हायला पाहिजे. केवळ मागासवर्गीयांना आरक्षण कशाला. आरक्षणावरून लोकांना मारहाण झाली. जीव द्यावा लागला. किती भांडणे झाली. शेवटी आपण पाहतो, या जन्मीचे याच जन्मी फेडावे लागते, असे त्यांनी नमूद केले.”