पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथमध्ये साजरी करणार यंदाची दिवाळी

0
713

नवी दिल्ली, दि.५ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी केदारनाथमध्ये साजरी करणार आहेत. नरेंद्र मोदी दिवाळीच्या एक दिवस आधी (६ नोव्हेंबर) केदारनाथच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याची जोरदार तयारी सुरू आहे.

केदारनाथपासून ४०० मीटर उंचावरील ध्यान गुंफा (मेडीटेशन केव्ह) भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र बनणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी या ध्यान गुंफेचे लोकार्पण करण्यात येणार आहे, असे रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी मंगेश घिल्डियाल यांनी सांगितले.

ध्यान गुंफा पाच मीटर लांब आणि तीन मीटर रुंद आहे. एकावेळी एका व्यक्तीला योग आणि ध्यान-धारणा करता येणार आहे. टेलिफोन, पाणी, वीज आणि स्वच्छतागृह आदी सोयीसुविधांयुक्त ही गुंफा असणार आहे. या गुंफेच्या प्रसिद्धीसाठी जिल्हा प्रशासन सोशल मीडियावर मोहीम राबवणार आहे.