महात्मा गांधी जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांचे नाट्य सादर

0
575

चिंचवड, दि. २ (पीसीबी)  येथील न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांच्या वतीने चिंचवडगावातून फेरी व महात्मा गांधी यांच्या जीवनावरील  नाट्य सादर करून महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली.

कोणाला जिंकायचे असेल तर प्रेमाने जिंका, अहिंसा हे बालवानाचे शस्त्र आहे, धीर म्हणजे स्वतःची परीक्षा पहाणे, अशा आशयाचे फलक घेऊन विद्यार्थ्यांच्या वतीने चिंचवडगावातून फेरी काढण्यात आली.

यावेळी चिंचवड मधील चापेकर चौकात व गांधी पेठेत गांधीजी यांची जीवन यात्रा ही नाटिका बाल चमूंनी सादर केली. या प्रसंगी संस्थेचे नीलकंठ चिंचवडे,  सुनील चिंचवडे, ए जी खेडकर, योगिता बनकर व शिक्षक वृंद उपस्थित होते.