महापालिकेत महात्मा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

0
467

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.