गांधी जयंतीनिमित्त जमा केले १२ पोती प्लॅस्टीक

0
364

पिंपरी, दि. 2 (पीसीबी) – संस्कार प्रतिष्ठान, नेहरु युवा केंद्र पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी व इंडो अॅथलेटीक सोसायटी यांच्या वतीने आज गांधी जयंतीनिमित्त व स्वच्छ भारत अभियानातर्गत प्लॅस्टीक मुक्त भारत अपक्रम राबविण्यात आला.

फिट इंडिया हा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण भारतात करण्याबाबत आव्हान केले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आज त्यावेळी रावेत पुल तसेच पुनावळे व वाल्हेकरवाडी परिसरामध्ये सकाळी ५० सायकलीस्ट सहभागी झाले होते. त्याचे उदघाटन नेहरु युवा केंद्र पुणेचे समन्वयक यशवंत मानखेडकर आणि ब प्रभाग अधिकारी सहाय्यक आयुक्त संदिप खोत यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी मानखेडकर म्हणाले “स्वच्छ भारत अभियानाअंर्गत संपुर्ण भारत प्लॅस्टीक मुक्त करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केले. आज महात्मा गांधी यांची १५० वी जयंतीच्या निमित्ताने सुरुवात केली आहे. आपण फिट इंडिया म्हणुन धावत धावत रस्त्यावरील व रस्त्याच्या कडेला पडलेले प्लॅस्टीक जमा करत जायचे, असा हा उपक्रम होता. त्यामध्ये एकुण १२ पोती प्लॅस्टीक २० किलोमीटर परिसरामध्ये जमा केले. रावेत ते कामशेत हायवे लगत प्लॅस्टीक, पाण्याच्या बाटल्या जमा केल्या.

यावेळी महापालिका ब प्रभाग अधिकारी खोत यांनी मतदार जनजागृती संदर्भात मार्गदर्शन केले. रावेत चौकातुन सकाळी सकाळी फिरायला येणाऱ्या व कामाला जाणाऱ्या कामगार बंधुंना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. ५०० नागरिंकांना पत्रके वाटून जनजागृती केली.

संस्कार प्रतिष्ठानचे २५ सभासद व डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयचे २५ एनएसएसचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. या उपक्रमाचे संयोजन डॉ. मोहन गायकवाड, इंडो अॅथलेटीक सोसायटीचे अध्यक्ष गजानन खैरे, डॉ. डी. वाय. पाटीलचे डॉ मारुती शेलार, राकेश मिश्रा, परिमल बर्वे, मनोहर कड, जयवंत सुर्यवंशी, विरेंद्र केळकर, रुपाली कड, श्याम चौहान, संदिप अवचार, मिलन गायकवाड, मोनिका पाटणे यांनी केले.