चिंचवडमध्ये वडिलांचा अंतविधी करण्यासाठी गेलेल्या कुटूंबाच्या घरात चोरी

739

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – वडिलांचा अंतविधी करण्यासाठी गावी गेलेल्या एका कुटूंबाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी तब्बल सव्वादोन लाखांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवार (दि.१४) रात्री दहा ते सोमवार (दि.१५) पहाटे साडेपाचच्या दरम्यान चिंचवड वाल्हेकरवाडी मधील आगा कॉलनी येथे घडली.

याप्रकरणी घरमालक बाबुराव भास्कर दराडे (वय ४२, रा. सर्वे नं.८०/२, आगा कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीअनुसार,  बुधवारी (दि.३ ऑक्टोबर) फिर्यादी बाबुराव यांचे वडिल वारले होते. यामुळे ते सहकुटूंब वडिलांच्या अंतविधीसाठी मुळगावी गेले होते. दराडे कुटूंब इतर विधी करण्यासाठी देखील रविवार (दि.१४ ऑक्टोबर) पर्यंत गावीच थांबले. यादरम्यान दराडे यांचे चिंचवड येथील घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि एल.ई.डी टिव्ही असा एकूण २ लाख १८ हजारांचा ऐवज चोरुन नेला. चिंचवड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.