चिंचवडमध्ये जागेच्या वादातून टपरी पेटवली; आगीत दोन बकऱ्यांचा मृत्यू

1010

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – किराणा मालाची टपरी असलेली जागा खाली न केल्याच्या रागातून एकाने ती पेटवून दिली. या घटनेत टपरीतील दोन बकऱ्यांचा जळून मृत्यू झाला. ही घटना आज सोमवार पहाटे तीनच्या सुमारास चिंचवडमधील अण्णासाहेब मगर झोपडपट्टी येथील पुलाच्या खाली असलेल्या खुशबु किराणा स्टेअर्स या दुकानात घडली.

याप्रकरणी रफिक चाँदसाहेब शेख (वय २७, रा. अण्णासाहेब मगर झोपडपट्टी मस्जिदतच्या पाठीमागे, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जावेद मुसा कुरेशी (वय ३६, रा. अण्णासाहेब मगर झोपडपट्टी, मस्जिदतच्या पाठीमागे, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रफिक शेख यांची चिंचवड येथील अण्णासाहेब मगर झोपडपट्टी पुलाच्या खाली खुशबु किराणा स्टेअर्स नावाची किराणा मालाची टपरी आहे. ही टपरी ज्या जागेत आहे त्या जागेवरुन रफिक आणि जावेद यांच्यात वारंवार वाद होत होते. याच रागातून आरोपी जावेद याने रफिक यांची टपरी आज पहाटे तिनच्या सुमारास पेटवून दिली आणि पसार झाला. या टपरीमध्ये दोन बकऱ्या होत्या. त्यांचा होरपळून मृत्यू झाला तर दुकानातील फ्रिज आणि इतर साहित्य असे एकूण ५४ हजारांचे नुकसान झाले आहे. आरोपी जावेद याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पालांडे तपास करत आहेत.