चिंचवडगावातील टेबल-टेनिस प्रशिक्षण केंद्राचे आमदार लक्ष्मण जगतापांच्या हस्ते उद्घाटन

0
546

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक १८ मधील चिंचवडगाव येथील पै. कै. मुरलीधर माचुत्रे व्यायामशाळेतील टेबल-टेनिस प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शनिवारी (दि. ५) करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, विठठल भोईर, विभिषण चौधरी, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, संदिप खोत, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशाल पुरंदरे यांनी केले. मोरेश्वर शेडगे यांनी आभार मानले.