अमितच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर!

0
625

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे चिरंजीव अमित यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी   मातोश्रीवर दाखल झाले आहेत. राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांना अमित यांच्या लग्नाचे निमंत्रण देऊन लग्नपत्रिका दिली. त्याआधी राज यांनी डल्लास अपार्टमेंटमध्ये जाऊन जयदेव ठाकरे यांनाही लग्नाचे निमंत्रण दिले आहे.  

येत्या २७ जानेवारीला अमित यांचा विवाह मिताली बोरूडेसोबत होणार आहे. राज यांनी अमित यांच्या लग्नाचे पहिलं निमंत्रण  ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना दिले आहे. राज ठाकरे सर्वांना घरी जाऊन, भेटून लग्न सोहळ्याचे निमंत्रण देत आहेत. लवकरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे त्यांना भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे.

येत्या २७ जानेवारीला दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातील ‘सेंट रेजिस’मध्ये हा विवाहसोहळा होणार आहे. ११ डिसेंबर २०१७ रोजी राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून अमित-मितालीचा साखरपुडा पार पडला होता.