चार आमदारांचे तरूणीसोबतचे अश्लील नृत्य सोशल मीडियावर व्हायरल

0
859

पाटणा, दि. १० (पीसीबी) – बिहार मधील चार आमदारांचा एका तरूणीसोबतचा  अश्लील नृत्य करीत असल्याचा एक व्हिडिओ  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात  व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात  एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे  सोशल मीडियावर  संताप व्यक्त केला जात आहे. 

आमदार यदुवंश कुमार यादव यांच्यासह तीन आमदार १ जून रोजी मोरेह येथे दौऱ्यावर  गेले होते. यावेळी एका तरुणीसोबत जबरदस्तीने त्यांनी  डान्स केला.  त्यातच  डान्स करताना  या आमदारांनी  अतिशय अश्लील वर्तन केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यावेळी  यदुवंश कुमार यादव यांच्यासोबत भाजपचे सचिन प्रसाद सिंह, जेडीयूचे राज कुमार राय आणि आरजेडीचे शिवचंद्र राम  हे आमदार होते.

या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात आमदारांच्या वर्तनावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे वर्तन करणे, चुकीचे आहे. सार्वजनिक क्षेत्रात काम करताना आपले वर्तन स्वच्छ ठेवणे अपेक्षित असते. मात्र, या आमदारांनी आपल्या वागणुकीतून लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या  आहेत.