पिंपळे सौदागरमध्ये जमिनीत मुरुम टाकल्याच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधी तक्रार दाखल

0
608

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – जमिनीमध्ये मुरुम टाकल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शनिवारी (दि.८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सर्व्हे क्र. १७/१, शिंदे कॉलनी केशवनगर, डेस्टीनी सोसायटीच्या समोर, पिंपळे सौदागर येथे घडली.

याप्रकरणी शिंदे आणि काटे कुंबातील १० ते १५ जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जिवन काटे, भुषण काटे, गणेश काटे आणि त्यांचे अज्ञात साथीदार तसेच शुभम शिंदे, प्रसाद शिंदे, दत्तात्रय शिंदे, सुरेखा शिंदे आणि त्यांच्या साथीदारांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवनगर, डेस्टीनी सोसायटीच्या समोरील जमिनीवर शिंदे आणि काटे कुंटुंब दावा करत आहेत. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या ठिकाणी मुरुम टाकण्याच्या कारणावरुन दोन्ही कुंटुंबात लाकडी फावड्याने तुंबळ हाणामारी झाली. यामुळे दोन्ही कुटुंबातील १० ते १५ जणांविरोदात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  सांगवी पोलीस तपास करत आहेत.