चाकणमध्ये शेतातून ट्रॅक्टर नेल्याच्या रागातून दोघांना लोखंडी खोऱ्या आणि दगडाने जबर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी

0
597

चाकण, दि. २ (पीसीबी) – शेतातून ट्रॅक्टर नेल्याच्या रागातून चौघा जणांनी मिळून एका तरुणाला लोखंडी खोऱ्याने आणि दगडाने जबर मारहाण करुन त्यांचे नाक फ्रॅक्चर केले. तसेच भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या तरुणाच्या चुलतीला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना वाकी खुर्द येथील घोडदरी वस्तीतील जमीन गट क्र. ४७ आणि ४८ मधील शेतात घडली.

याप्रकरणी प्रणव दत्तात्रय कड (वय २१, रा. वाकी खुर्द, घोडदरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कुंडलिक विठोबा कड (वय ४८), शांताराम कुंडिक कड (वय ३०), केसर मधुकर कड (वय ४६) आणि पुनम गणेश कड (वय २८, सर्व रा. घोडदरी वाकी खुर्द) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.९ मार्च) रोजी फिर्यादी प्रणव याने आरोपींच्या शेतातून ट्रॅक्टर नेल्याच्या रागातून आरोपींनी प्रणव याला लोखंडी खोऱ्याने आणि दगडाने जबर मारहाण करुन त्यांचे नाक फ्रॅक्चर केले. तसेच भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती आलेल्या प्रणवच्या चुलतीला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चौघा आरोपींविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस तपास करत आहेत.